तीस्ता सेटलवाड यांना ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठाकडून पीएचडी ‘भारतातील सद्य:स्थिती अधिक आव्हानात्मक आणि धोकादायकही आहे - Loksatta
24, Jun 2020 | Loksatta Staff
मानवाधिकार कार्यकर्त्यां आणि पत्रकार तिस्ता सेटलवाड यांना ‘युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया’ने मानद पीएचडी जाहीर केली आहे.
सेटलवाड या ‘सिटिझन फॉर जस्टीस अॅण्ड पीस’ या संस्थेच्या सचिव आहेत. २००२ मध्ये गुजरात दंगलीतील बळींना न्याय मिळवून देण्यासाठी चळवळ उभी करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. मानवाधिकार, महिलांचे हक्क, आदिवासी हक्क, धार्मिक अल्पसंख्याकांचे प्रश्न यासाठी त्या काम करतात,’ असे विद्यापीठाने त्यांच्या मानपत्रात नमूद केले आहे.
सत्ताधारी आणि अधिकारांचा मनमानी वापर करणाऱ्यांच्या विरोधातील, वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याची लढाई आव्हानात्मक होती. ‘भारतातील सद्य:स्थिती अधिक आव्हानात्मक आणि धोकादायकही आहे,’ अशा भावना सेटलवाड यांनी व्यक्त केल्या.
सेटलवाड यांच्यासह चिनी-कॅनडियन नृत्यांगना शॅन हॉन गो, कॅनडियन लेखक लॉरेन्स हिल, कॅनडियन म्युझिक हॉल ऑफ फेमचे सदस्य डग जॉन्सन, डिमेन्शिया रुग्णांच्या हक्कांसाठी लढणारे अॅड जीम मन आणि महिलांसाठी काम करणाऱ्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया’च्या कुलपती सारा मॉर्गन सिल्वेस्टर यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात येणार आहे.
The original article may be read here.