Menu

Citizens for Justice and Peace

प्रमिला ताईंच्या शब्दातून कत्तल झालेल्या झाडांची व्यथा Aarey Forest Residents fight for their rights

22, Oct 2019 | CJP Team

प्रमिला ताई म्हणतात कि ४ ऑक्टोबर रोजी आम्हाला कळले कि आरे मधील झाडे कापण्यात येत आहे त्याचवेळी आम्ही सर्वजण तिथे गेलो आणि त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. आम्ही खूप विनंती केल्यानंतर आम्हाला आत सोडण्यात आले परंतु त्यापूर्वीच त्यांनी ४०० पेक्षा जास्त झाड कापली होती. तिथल्या जवळच्या एका मैदानात आम्ही सर्वजण जवळपास अर्धा तास बसलो होतो तेथून आम्हाला बळजबरीने पोलिसांच्या गाडीत नेऊन बसवण्यात आले. थोड्या वेळाने आम्हाला पुन्हा गाडीतून बाहेर काढले. तेव्हा आम्ही बिरसा मुंडा चौकाजवळ बसून गाणी गात असताना त्यांनी आम्हाला सांगितलं कि तुम्ही आता ऐकलं नाही तर आम्ही तुमच्यावर लाठीचार्ज करू. आणि थोड्याच वेळात आम्हाला खेचाखेची करून गाडीत बसवण्यात आले. काही मुला-मुलींना थोडी इजा झाली. आम्ही विचारलं कि मॅडम आम्हाला कोणत्या पोलीस स्टेशन ला घेऊन जात आहात तेव्हा ड्राइवर म्हणाला कि येईलच इतक्यात कळेल तुम्हाला. आणि आम्हाला ते दहिसर पोलीस स्टेशनला घेऊन गेले. आमच्यातल्या काही मुलींनी विनंती केली कि आम्हाला जाऊ द्या आमची परीक्षा आहे त्यावर फक्त ४ मुलींना सोडण्यात आले. आणि आम्हाला ट्रॉमा हॉस्पिटलला चेकअपसाठी नेलं आणि तिथून शनिवारी बोरिवली कोर्ट मध्ये घेऊन गेले. तिथे आमची चौकशी करण्यात आली. आणि ६.३० दरम्यान आम्हाला भायकळा जेल मध्ये नेऊन टाकलं. दोन दिवसानंतर सोमवारी रात्री १२.३० च्या सुमारास आमच्या सह्या घेऊन आम्हाला सोडण्यात आले.

आम्हाला खूप वाईट वाटत आहे कि आम्ही जेल मध्ये असताना शनिवारी दुपारी सुद्धा भरपूर झाडे कापून टाकली कोणाला हि तिथे न थांबू देता. त्या दिवशी आमच्या मुलांना शाळेत व कामावर जाण्यास पोलिसांनी बंदी घातली. झाडं कापल्यामुळे ऑक्सिजन नष्ट झाले असून काँक्रीट चे रस्ते झाल्यावर पावसाचे पाणी जाण्यास वाव नसेल त्यामुळे मुंबई बुडण्याची शक्यता आहे. मिठी नदी अरुंद असून त्याजवळचे जंगल सुद्धा तोडले गेले आहे. सर्वीकडे काँक्रीट चे रस्ते बनवून पर्यावरण संपवत चालल्यामुळे खूप नुकसान होणार आहे. आदिवासी लोकांचे जीवन भाजीपाला-फळे-भातशेती पिकवून ते विकून त्यावर घर चालते. इतक्या झाडांचे नुकसान करून सरकार आमच्या कडून मतांची अपेक्षा करतात. त्यांना कारशेड साठी खुली जागा दिलेली असूनसुद्धा त्यांनी झाडांची कत्तल केली. तेथील वन्यप्राणी हि मारले गेले. आदिवासी लोकांचे जीवन, झाडे, पशु-पक्षी आणि वन्यप्राण्यांचा जीव घेऊन त्यांनी काय मिळवलं.

Related:

Aarey! What’s going on?

Aarey: Mumbai’s struggle to save its lungs

Inside Aarey: Where the Adivasis are fighting another battle

How Adivasis in Aarey are at risk of losing their land and livelihood

Meet this Lover of the Aarey Forest, Prakash Bhoir

In Pictures: A Walk Through Aarey

The Mystery of the Aarey Fire and the Need for a Citizens’ Inquiry

Banjar Zameen: A Prayer to Save Aarey

Aarey Adivasi’s Roar at Public Hearing

 

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Go to Top